उल्हासनगर : सेंट्रल पोलिस स्थानकाच्या परिसरात वाढत्या प्रमाणात अवैद्य स्वरूपातील धंदे एच.पी. नावाचा ज्वलनशील रसायन पदार्थ उतरविण्याचे काम अवैधरीत्या केले जात आहे. शांतीनगर उल्हासनगर ३ मध्ये हा अवैद्य धंद्याचे प्रमाण वाढत्या प्रमाणावर दिसून येत आहे. सोनु, रामदास आणि रामचंद्र शेठ हे केमिकल माफीया पोलिस प्रशासन आणि सरकार यांच्या नाकावर टिचून हा अवैद्यधंद्या करीत आहेत. सदर रसायन इतके स्फोटक आहे की, उतरवीत असताना जमीनीवर | पडल्यास स्फोट / पेट घेतला जाऊ शकतो. एक वर्षापूर्वीच डोंबीवली | मधील प्रोबेस कंपनीचे उदाहरण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहेच. डोंबिवली मध्ये झालेल्या स्फोटाची पुनरावृत्ती उल्हासनगरमध्ये घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने वेळीच काळजी घ्यायला हवी आहे. उल्हासनगर | मधील सर्व लोकांचे जीवन हे पोलिस प्रशासनाच्या हातात आहे.
उल्हासनगरमध्ये अवेद्यधद्याना प्रोत्साहन