डोंबिवलीत जूगार माफियाचा सळसळाट

डोबिवली (फारुख): टिळक नगर पोलिस स्थानकाच्या परिसरात अवैद्य स्वरुपात जूगार माफीयांचे प्रमाण वाढत्या स्वरुपात दिसून आले आहे. त्यातीलच दिनेश पुजारी नावाचा इसम हा तीन पत्ता, घोडी आणि काठी अशा प्रकारचा जूगार पोलिस प्रशासनाला जराही नं घाबरता दिवस-रात्र कचोरे गांव या ठिकाणी चालवित आहे. तेथून ये-जा करणारी शाळकरी मुले देखिल पालकांनी दिलेले पैसे या जूगाराच्या अड्यावर उडविताना दिसत आहेत. __शाळकरी मुले जुगारी बनू नये यासाठी वेळीच पोलिस प्रशासनाने या अवैद्य धंद्यांवर कडक कारवाई करुन या धंद्यांवर अळा बसविला पाहिजे.स्थनिकांनी वेळोवेळी तक्रारी करुन देखील या अवैद्य धंद्यावर चोप बसला नाही आहे. जूगार माफिया आणि स्थानीक पोलिस स्थानक यांच्यामध्ये काही साटेलोटे आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.